अमरावती - अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी माणुसकीचा परिचय देत तलावातील गाळात फसलेल्या एका हरणाला मासेमारांच्या मदतीने जीवदान दिले आहे.
आमदार रवी राणांकडून माणुसकीचे दर्शन; गाळात फसलेल्या हरणाला दिले जीवदान - MLA Ravi Rana gave life to deer
आमदार रवी राणा यांनी माणुसकीचा परिचय देत तलावातील गाळात फसलेल्या एका हरणाला मासेमारांच्या मदतीने जीवदान दिले आहे.
अमरावती तालुक्यातील जंगलात असणाऱ्या भिवापूर तलावातील गाळात गेल्या 2 दिवसापासून हरीण अडकले होते. दरम्यान, याची माहिती आमदार रवी राणा यांना मिळताच त्यांनी मानवतेचा परिचय देत त्या हरणाला गाळातून काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी मासेमारी करणाऱया नागरिकांना बोलावून त्यांच्या मदतीने हरणाला बाहेर काढून त्याला वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नने एका मुक्या प्राण्याचा जीव वाचला आहे. दरम्यान, आज आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिम्मित विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासाठी आमदार रवी राणा यांनी आपला आमदारकीचा 3 वर्षाचा पगार अर्पित केला आहे.