अमरावती - सभागृहाची अवस्था दिवानजी शिवाय काम चालू आहे, अशी झाली आहे. अधिवेशनाच्या 2 दिवस आधी मंत्रिमंडळाचे खाते वाटप होईल, अशी माहिती आम्हाला आहे. कदाचित खाते वाटप नाही झाले तर सर्व प्रश्नःची उत्तरे देण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे. प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मुख्यमंत्र्यांचेही कान पकडण्याचा अधिकार आम्हाला आहे, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनाच नाही तर डोनाल्ड ट्रम्प जरी आडवे आले तरी त्यांनाही घेरणार, असा इशाराही भुयार यांनी दिला आहे. भुयार हे जिल्ह्यातील वरुड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकारी कार्यालयात डिपीडीसी आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर भुयार यांनी माध्यमांशी संवाद साधला.