महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बळीराजाला लढण्याचे बळ दे, महिलांना सक्षम बनव; यशोमती ठाकुरांचे गौरीला साकडे

अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील आपल्या निवासस्थानी मंत्री यशोमती ठाकूर यांनी ज्येष्ठा गौरीचे पूजन केले. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर, केंद्रातल्या अन्यायी सरकारने वाढलेली महागाई आणि बेरोजगारी लवकरात लवकर कमी कर. मुख्य म्हणजे या राज्यातील माय भगिनींच्या पोषणासाठी, सशक्तीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी झुंजण्याचे बळ दे. महिलांवरील अत्याचार थांबू दे, असे साकडे गौरी मातेकडे घातले आहे.

Minister Yashomati Thakur's prayer to Gaurai in mozri, Amravati
बळीराजाला लढण्याचे बळ दे, महिलांना सक्षम बनव; यशोमती ठाकुरांचे गौरीला साकडे

By

Published : Sep 13, 2021, 7:09 PM IST

अमरावती -राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज (सोमवार) अमरावती जिल्ह्यातील त्यांच्या मोझरी येथील आपल्या निवासस्थानी ज्येष्ठा गौरीचे पूजन केले. ठाकूर दरवर्षी आपल्या मोझरी येथील मूळ गावी कुटुंबासोबत गौरी उत्सवाला येत असतात. मंत्री पदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी या उत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे. आज मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोझरी येथे येऊन आपल्या कुटुंबासमवेत गौरीची पूजा केली तसेच बळीराजाला लढण्याचे बळ दे, महिलांना सक्षम बनव, असे साकडे त्यांनी ज्येष्ठा गौरीला घातले.

बळीराजाला लढण्याचे बळ दे, महिलांना सक्षम बनव; यशोमती ठाकुरांचे गौरीला साकडे

राज्याच्या हितासाठी ठाकूर यांचे गौरीला साकडे -

राज्यातील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर, केंद्रातल्या अन्यायी सरकारने वाढलेली महागाई आणि बेरोजगारी लवकरात लवकर कमी कर. मुख्य म्हणजे या राज्यातील माय भगिनींच्या पोषणासाठी, सशक्तीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी झुंजण्याचे बळ दे. महिलांवरील अत्याचार थांबू दे, सगळ्यांना सद्बुद्धी दे माय, माय भगिनींच्या रक्षणासाठी सरकारचे हात अधिक मजबूत कर ग माय". अशा शब्दात गौरी मातेकडे राज्याच्या हितासाठी मंत्री ठाकूर यांनी साकडे घालून प्रार्थना केली.

हेही वाचा -Gauri Festival : आज ज्येष्ठा गौरी पूजन; विदर्भात आंबील, फळांच्या नैवेद्याला महत्व

ABOUT THE AUTHOR

...view details