महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पण.. मी खचणार नाही, मी तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत जन्मलीय'

गाईचे दर्शन घेतल्याने आणि तिच्या पाठीवर हात फिरवल्याने नकारात्मकता नष्ट होते, असे वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर टीका झाल्याने यशोमती ठाकूर यांनी हे स्पष्टीकरण दिल आहे.

यशोमती ठाकूर, कॅबिनेट मंत्री
यशोमती ठाकूर, कॅबिनेट मंत्री

By

Published : Jan 12, 2020, 5:21 PM IST

अमरावती- गाईचे दर्शन घेणे ही परंपरा आहे, गाईचे गोमूत्र हे रासायनिक द्रव्य आहे, गाय ही माता आहे. पण यातून चुकीचा अर्थ काढून मी महिला असल्याने मला ट्रोल केले जाते, हे चुकीचे आहे. मात्र, अशा प्रकारे ट्रोल केल्याने मी खचणार नाही तर आणखी जोमानं काम करणार आहे. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीत जन्मलेली आहे, असे सणसणीत उत्तर राज्याच्या कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्रोल करणाऱ्यांना दिले आहे.

यशोमती ठाकूर, कॅबिनेट मंत्री

गाईचे दर्शन घेतल्याने आणि तिच्या पाठीवर हात फिरवल्याने नकारात्मकता नष्ट होते, असे वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर टीका झाल्याने यशोमती ठाकूर यांनी हे स्पष्टीकरण दिल आहे.

एका कार्यक्रमात बोलताना मंत्री ठाकूर म्हणाल्या होत्या, की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूप सारे कोर्स येत आहेत. यामध्ये मोठे मोठे लोक प्रशिक्षण घेतात, यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही घेतला जातो. यामुळे आपण आपली संस्कृती विसरतो, आपल्यामधील जे नकारात्मक आणि नकारात्मकता येते, ती नकारात्मकता गाईच्या दर्शनामुळे निघून जाते. गाईचे दर्शन घेणे रूढी परंपरा आहे. लोकांची श्रद्धा विश्वास आहे. मात्र याचा विपर्यास चुकीचा काढला जातो. याचाच खेद वाटत आहे. मी महिला आहे म्हणून मला ट्रोल केले जातं आहे. मात्र, मी खचणार नाही तर लढणार, मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पाईक असल्याची प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details