महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या मंजिरी अलोणेचा मंत्री यशोमती ठाकुर यांच्या हस्ते गौरव - यशोमती ठाकूर

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरची मंजिरी मनोज अलोणे हिने पोलंड येथे पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भाग घेतला होता. मंजिरीने या स्पर्धेत आपली छाप सोडत कास्य पदक जिंकलं. तिच्या या यशाचे कौतुक मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

Minister Yashomati Thakur felicitates Archer manjiri alone for winning bronze medal in World Archery Championships
जागतिक तिरंदाजी स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या मंजिरी अलोणेचा मंत्री यशोमती ठाकुर यांच्या हस्ते गौरव

By

Published : Aug 23, 2021, 9:58 PM IST

अमरावती -पोलंड येथे नुकतीच जागतिक तिरंदाजी स्पर्धा पार पडली आहे. जागतिक स्तरावरिल या स्पर्धेत अमरावतीच्या मुलीने दमदार कामगिरी केली. अशा गुणवंत खेळाडूंचा गौरव महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरची मंजिरी मनोज अलोणे हिने पोलंड येथे पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भाग घेतला होता. मंजिरीने या स्पर्धेत आपली छाप सोडत कास्य पदक जिंकलं. तिच्या या यशाचे कौतुक मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. यावेळी मंजिरीसह आंतरराष्ट्रीय खेळाडू साक्षी तोटे, एकलव्य गुरुकुलचे मुख्याध्यापक विलास मारोटकर, भारतीय संघाचे प्रशिक्षक अमर जाधव व शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते सदानंद जाधव गुरुजी यांनाही गौरविण्यात आले.

तिरंदाज मंजिरी अलोणेसह खेळाडू, प्रशिक्षकांचा मंत्री यशोमती ठाकुर यांच्या हस्ते गौरव
पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एकलव्य क्रीडा अकादमीतर्फे यापुढेही असेच गुणवंत खेळाडू घडावेत व अमरावती जिल्हा, महाराष्ट्र व देशाचे नाव जागतिक स्तरावर अधिकाधिक उज्ज्वल होवो, अशा शुभेच्छा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details