अमरावती - स्वाभिमानीचे मोर्शी मतदारसंघाचे उमेदवार देवंद्र भुयार यांच्यावर कोणीही हल्ला केला आहे. त्यांची ही केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. देवेंद्र भुयार यांच्या गाडीवर हल्ला करत गाडी पेटवल्याची घटना घडली होती.
देवेंद्र भुयार यांची केवळ स्टंटबाजी, सदाभाऊ खोत यांचा आरोप - maharashtra assembly election
स्वाभिमानीचे मोर्शी मतदारसंघाचे उमेदवार देवंद्र भुयार यांच्यावर कोणीही हल्ला केला नसून, त्यांची ही केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.
मोर्शी मतदारसंघात डॉ. अनिल बोंडे यांच्या विरोधात स्वाभिमानीचे देवेंद्र भुयार हे निवडणूक लढवत आहेत. मला असा संशय आहे की ही गाडी त्यांनी स्वतः पेटवून घेतली असावी. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लोकांना स्टंटबाजी करण्याची सवय आहे. कारण मी 32 वर्षे चळवळीत काम केले आहे. पण बाहेरून आलेले लोक असे कृत्य करतात. आज दिवसभर देवेंद्र भुयार यांचे रक्त लागलेले फोटो व्हयरल होतील. आमच्याकडे अशाच पद्धतीने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला परंतू, आम्ही त्याचा पर्दाफाश केल्याचे खोत म्हणाले.