अमरावती -महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली २ लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. असे वक्तव्य करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता यात शिवसेनेचे नेते राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी उडी घेत. बच्चू कडू यांना २ लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा टोला अब्दुल सत्तारांनी लगावला आहे. या त्यांच्या टीकेला आज (शनिवारी) बच्चू कडूंनी उत्तर दिले आहे.
हेही वाचा - 'मैदान सोडून पळणारा मी नाही; सरकार येत नाही तोपर्यत कुठेही जाणार नाही'