महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : चांदूर रेल्वे येथे व्यापाऱ्याची ६० हजारांची पिशवी पळवली - अमरावतीमध्ये व्यापाऱ्याला लुटले

अमरावतीमध्ये व्यापाऱ्याची ६० हजार रुपयांची पिशवी पळवल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून येणार्‍या दोन अज्ञात व्यक्तींनी व्यापाऱ्याची पिशवी हिसकावत पोबारा केला.

स्टेट बँक ऑफ इंडिया मधून व्याराऱ्याने पैसे काढले होते

By

Published : Sep 28, 2019, 4:37 PM IST

अमरावती - चांदूर रेल्वे येथे भरदिवसा ६० हजार रुपयांची पिशवी पळवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अमरावतीमध्ये व्यापाऱ्याची ६० हजार रुपयांची पिशवी पळवल्याची घटना घडली आहे


शहरातील व्यापारी मनीष बालकिसन मुंदडा यांनी स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया मधून ६० हजार रुपये काढले. पैसे काढल्यानंतर त्यांनी पैसे पिशवीमध्ये ठेवले. यानंतर मुंदडा दुचाकीवरून कुऱ्हा रस्त्याकडे निघाले. त्यावेळी दुचाकीवरून येणार्‍या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांची पिशवी हिसकावत तेथून पोबारा केला.

हेही वाचा - अमरावती : ऑक्सीजन पार्कजवळ धावती कार पेटली

मनिष मुंदडा यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास ठाणेदार संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details