महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Melghat forest vegetables मेळघाटातील या पौष्टिक रानभाज्या खवय्यांसाठी पर्वणीच

सातपुडा पर्वत रांगेत वसलेला Melghat forest vegetables मेळघाट हा संपूर्ण प्रदेश पौष्टिक अशा रानभाज्यांनी समृद्ध आहे. अनेक काळापासून मेळघाटातील Melghat forest wild vegetables plants जंगलात वसलेल्या आदिवासी बांधवांना या रानभाज्यांची संपूर्ण माहिती Melghat forest nutritious wild vegetables आणि महत्व ठाऊक असून ऋतुमानानुसार प्रत्येक भाजी आदिवासी बांधवांच्या घरात Melghat forest news खाल्ली जाते.

Melghat forest nutritious wild vegetables
मेळघाट जंगल रानभाज्या

By

Published : Aug 16, 2022, 12:20 PM IST

अमरावती -सातपुडा पर्वत रांगेत वसलेला Melghat forest vegetables मेळघाट हा संपूर्ण प्रदेश पौष्टिक अशा रानभाज्यांनी समृद्ध आहे. अनेक काळापासून मेळघाटातील Melghat forest wild vegetables plants जंगलात वसलेल्या आदिवासी बांधवांना या रानभाज्यांची संपूर्ण माहिती Melghat forest nutritious wild vegetables आणि महत्व ठाऊक असून ऋतुमानानुसार प्रत्येक भाजी आदिवासी बांधवांच्या घरात Melghat forest news खाल्ली जाते. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी देखील अशा रानभाजींच्या मेजवानीचा बेत मेळघाटाच्या जंगलात अनुभवता येतो.

रानभाज्यांविषयी माहिती देताना ग्रामस्थ

हेही वाचाTore Down The Banner सरकारने हमारा अनाज कम किया म्हणत फाडले होते त्याने बॅनर

रानभाज्यांमध्ये हे गुणधर्मनिसर्गाचा समृद्ध ठेवा असणाऱ्या आरोग्यदायी रानभाज्यांमध्ये लोह, तंतुमय पदार्थ, विविध प्रकारची खनिजे आणि अनेक औषधी गुणधर्म असतात. डोंगर खोऱ्यांमध्ये उगवलेल्या या भाज्या अतिशय शुद्ध असल्यामुळे त्यांच्या सेवनामुळे शरीराला दीर्घकाळासाठी आरोग्यदायी लाभ होतो.

पावसाळ्यात रानभाज्यांची चंगळमेघाटात प्रत्येक ऋतूमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या Melghat forest is full of nutritious wild vegetables खायला मिळतात. मात्र पावसाळ्यात रानभाज्यांची सर्वाधिक चंगळ असते. पावसाळ्यामध्ये रानावनात तसेच शेताच्या बांधावर गावाशेजारी रानभाज्या उगवतात. नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या प्रदूषण मुक्त या भाज्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. खायला रुचकर असणाऱ्या या भाज्यांमध्ये कर्टुली, अंबाडी लाल, अंबाडी, भारंगी, तरोटा, अळू, वाघाटे, बांबू, शमी, उंबर, पाथर, मालकांगुली, सुरण, पांढरी मुसळी, शेवगा, भोकर, आघाडा, ज्योतीचे फुले, काटाआरा, फांगी, डोडा, शेलू, शेवगा, बाणा, तांबा, पिपरी, दोडा, कोयलरी हिवळी या भाज्यांचा समावेश आहे.

असे आहे रानभाज्यांचे वैशिष्ट्यविड्याच्या पानाच्या आकाराची केना या वनस्पतीची भाजी खाल्ल्यामुळे पचनक्रियेसंबंधी विकार दूर होतात. तसेच पोट साफ होते. लघवीशी संबंधित त्रासही कमी होतो. त्वचा विकार सूज आधी विकारांमध्ये केना खाणे हे अतिशय लाभदायी आहे. आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी खाल्ल्यामुळे शरीराला झिंक, तांबे, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळतात. हाडे मजबूत करण्यासाठी आघाडा अतिशय गुणकारी असून मधुमेहाचा आजार असणाऱ्यांना सुद्धा आघाड्याची भाजी खाणे अत्यंत लाभदायक आहे.

मेळघाटात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात कटुल्याच्या वेली वाढलेल्या दिसतात. औषधी गुणांनी युक्त असणारे कटुले खाल्ल्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात विटामिन्स, मिनरल्स आणि फायबर उपलब्ध होतात. मधुमेहाचा आधार असणाऱ्यांनी कटुल्याचे नियमित सेवन केले तर रक्तातील साखर देखील कमी होते. शेवग्याची पाने शेंगा फुले आणि मूळ या सर्वांचीच भाजी मेघटातील आदिवासी बांधव करतात. शेवग्यामध्ये दुधापेक्षा मोठ्या प्रमाणात कॅल्शियम जीवनसत्व आणि पोटॅशियम लोह आणि प्रथिने असतात. शारीरिक व मानसिक थकवा ही भाजी खाल्ल्यामुळे नाहीसा होतो. जंतुनाशक गुणधर्म मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर सुद्धा शेवगा अत्यंत उपयुक्त अशी रानभाजी आहे. यासह मेळघाटात उपलब्ध असणाऱ्या सर्व रानभाज्या या शरीरासाठी अत्यंत गुणकारक आहेत, अशी माहिती जैतादेही येथील ग्रामस्थ आणि शिक्षकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

झटपट तयार होते भाजीकुठल्याही मसाल्याची गरज नाही. अधिक तेलही नको. अगदी थोड्या तेलाच्या फोडणीमध्ये रानभाज्या तयार होतात. अनेक भाज्यांमध्ये केवळ कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि मिठ घालून त्या पाच ते दहा मिनिटात शिजवल्या जातात. केवळ बांबूची भाजी करायला वेळ लागते, अशी माहिती देखील जैतादेही येथील आदिवासी बांधवांनी दिली.

हेही वाचाFiring On Akola Police अमरावतीत अकोला पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला सिनेस्टाइल पकडले

ABOUT THE AUTHOR

...view details