अमरावतीमेळघाटातील बालमृत्यू Melghat child mortality प्रकरणाची चुकीची आकडेवारी विधानभवनात दिल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांना आरोग्य महासंचालकांनी नोटीस बजावली आहे. मेळघाटातील बालमृत्यू प्रकरणी आकडेवारी देताना सदोष माहिती पुरवल्याची धक्कादायक समोर आली Misleading information of District Health Officers to Vidhan Bhavan आहे. विधानभवनाला चुकीची माहिती का सादर करण्यात आली, यासंदर्भात आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अजित पवार यांनी जाणून घेतल्या होत्या आदिवासींच्या समस्याविरोधी पक्षनेता अजित पवार यांनी याच महिन्यात मेळघाटात दौरा करून अर्भक मृत्यू ,आदिवासी मुलांचे प्रश्न जाणून घेतले होते. याच प्रश्नावर विरोधकांना धारेवर धरत त्यांनी सभागृहात मेळघाटातील बालमृत्यू प्रकरणावर लक्ष वेधले होते. मेळघाटात अर्भक मृत्यूच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याची बाब अधिवेशनादरम्यान त्यांनी निदर्शनास आणून देण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी विधानभवनात सादर केलेल्या माहितीत प्रचंड तफावत असल्याचा आरोप विरोधक आमदारांनी घेतला, त्यामुळे सभागृहात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर नामुष्की ओढवली होती. आरोग्य विभाग त्यांच्याच मंत्र्यांची माहिती दडवीत असतील तर सामान्य माणसाचे काय हाल, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. एकंदरीत अधिवेशनात 23 ऑगस्टला आरोग्य विभागाच्या कामकाजावर बोट ठेवण्यात आले होते.