अमरावती- शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून सख्ख्या भावाने बहिणीसह तिच्या सुनेलाही काठीने जबर मारहाण केल्याची घटना जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली या गावात घडली. संजय भोयर, असे मारहाण केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जखमी उषा रमेश वाघे व सीमा रोशन वाघे या दोन्ही सासू-सुनेवर वर्ध्याच्या सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे.
शेतीच्या वादातून बहिणीसह सुनेलाही भावाची काठीने मारहाण - Swapnil Umap
शेतीच्या वादातून बहिणीसह तिच्या सुनेलाही भावाची काठीने मारहाण भावाविरूद्ध गुन्हा दाखल
मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाणे
आरोपी संजय भोयर यांच्या वडिलांनी आपल्या हक्काची शेती ही मुलगी उषा वाघे हिला दिली होती. तसा निर्णयही न्यायालयाने दिला होता, असे असताना आरोपी संजय भोयर हा शेतात काम करत होता. दरम्यान, शेतात गेलेली बहीण उषा वाघे व तिची सून सीमा वाघे या दोघांना शेतातच आरोपीने काठीने जबर मारहाण केली. पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल केला अधिक तपास करीत आहेत.