अमरावती :जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागामार्फत कुपोषण मुक्तीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येतात. पण तरीही मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात २३४ बालके (सॅम) अतितीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेळघाटातील कुपोषण कमी करण्यासाठी विशेष बाब म्हणून पेसाचा निधीमधून ४ हजार कमी वजनांच्या बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे बालके कुपोषित होण्यापासून वाचवण्यासाठी मदत होणार आहे.
या आहेत योजना : आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष, नवजात शिशू स्थिरीकरण कक्ष, ग्राम बालविकास केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील बाल उपचार केंद्र पोषण पुनर्वसन केंद्र , राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम तसेच माता आरोग्यासाठी जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, नवसंजीवनी योजनेतील मातृत्व अनुदान योजना, भरारी पथक योजना, दाई बैठक योजना अशा डझनांहून अधिक योजना आहेत. तरीही मेळघाटातील कुपोषण का संपत नाही? असा प्रश्न सर्वांना पडतो. हाच प्रश्न मेळघाटमधील काम करणाऱ्या खोज या संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांना विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले,-