महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Power bill : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी; शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अनके ठिकणी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी सक्तीने वीज बील वसूनली करण्याचे काम सुरू आहे. या विज वसुलीच्या करण्याच्या कारवाईमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. हे वीज बिल वसूली करण्याचे काम मागील ८ दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. दरम्यान, विज कनेक्शन कट करणे थांबवा अशी मागणी राष्ट्रवादीचे ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

To stop collection of Power bills from farmers
To stop collection of Power bills from farmers

By

Published : Feb 13, 2023, 8:07 PM IST

अमरावती : कृषी धोरणाच्या नावाखाली महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसूली करण्याचे काम मागील ८ दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू असून, विद्युत वितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी शेती पंपाचे कनेक्शन विविध भागात तोडणी चालू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या आर्थिक बाजूची थोडी तरी जाणीव करुन ही सक्तीची वीज वसुली थांबवून विज कनेक्शन कट करणे थांबवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून नैसर्गिक संकटांमुळे मागील काही वर्षापासून संत्राचा मृग बहार व आंबिया बहार फुटत नसल्यामुळे, योग्य भाव मिळत नसल्यामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टीने हाताला आलेली पीक जमीन दोस्त झाली खरीप शेतकऱ्याच्या हातून गेला रब्बी पिकाच्या उत्पन्नातून तरी चार पैसे मिळतील त्या उत्पादनातून चार पैसे हातावर येताच शेतकरी वीज बिल भरतील शेतकरी अडचणीत असल्यामुळे बिल भरू शकत नाही असही ते म्हणाले आहेत.

सक्तीची वीज बिल वसुली थांबवा शेतकऱ्यांची वीज तोडन्या आगोदर शेतकऱ्यांना लेखी नोटीस दिल्या शिवाय कुठल्याच शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करु नये, जर हे थांबणार नसेल तर शेती पिकांच नुकसान झालं तर त्याची विद्युत वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. एका डीपीवरील थकबाकी साठी संपुर्ण फिटर बंद करु नका आन्यथा आपल्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये :आधीच शेतकरी भीषण दुष्काळातून सावरत असताना शेतकऱ्यांकडून बिलापोटी कुण्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापले जाऊ नये अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना महावितरणकडून सर्रासपणे शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन कापले जात असल्याने नागरिकांमध्ये संतोष निर्माण होत असून विजेअभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये आणि शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाऊ नये यासाठी शासनाने सक्तीची वीज बिल वसुली थांबविण्याचे निर्देश महावितरण कंपनीला देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका अध्यक्ष यांनी केली आहे.

सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी :नैसर्गिक संकटांमुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच यावर्षी अतीरुष्टिमळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले असून शेत मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय नकोच अशी धारणा शेतकऱ्यांची आहे. मात्र, नाईलाजाने शेतकऱ्यांना शेती करावी लागते. अशा वेळी शेतकऱ्यांच्या भावना व कष्ट डोळ्यासमोर ठेवून सक्तीची वीज बिल वसुली करण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी अशी मागणी नरेंद्र जिचकार यांनी केली आहे.

हेही वाचा :Pawar on Fadnavis: देवेंद्र फडणवीस हे सभ्य नेते! 'त्या' खुलाशावर शरद पवारांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details