महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sambhaji Bhide : महात्‍मा गांधींचे खरे वडील मुस्लिम जमीनदार - संभाजी भिडेंचे खळबळजनक वक्‍तव्‍य

महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी असे त्यांचे पूर्ण नाव सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लिम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत. असे खळबळजनक वक्‍तव्‍य श्रीशिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावतीतील केले.

Sambhaji Bhide
संभाजी भिडे

By

Published : Jul 28, 2023, 2:10 PM IST

Updated : Jul 28, 2023, 3:15 PM IST

अमरावती : सभेत बोलताना भिडे यांनी महात्मा गांधींसंदर्भात पुरावे उपलब्ध असल्याचा दावा केला. ते म्हणाले की मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होत. करमचंद हे ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीला पळवून त्याच्या आणले. तिच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला, असे संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.

सर्वधर्म समभावाचा उपदेश नको :त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लिम जमीनदारांचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लिम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला. देशामध्‍ये सर्वधर्म समभावाचा उपदेश नकोच. अशा नेत्‍यांना राजकारणातून हद्दपार करावे, असे आवाहन संभाजी भिडे यांनी केले. हिंदुस्थान हा एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट आहे. परंतु हिंदू स्वतःचा धर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरला. हिंदुस्थानाची फाळणी झाली आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली, असे ते म्‍हणाले.

भिडेंच्या बंदोबस्ताची मागणी : संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, ही संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्यासंदर्भात सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे, जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे.

वातावरण अस्थिर करण्याचा हेतू :संभाजी भिडे वारंवार असे बोलतात, त्यांना पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडेंचा हेतू ओळखला पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी ते वारंवार अशी विधाने करतात? आम्ही सभागृहात संभाजी भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने तत्काळ कारवाई करावी. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही थोरात यांनी दिला आहे.

मणिपूरचा विषय भरकटण्याचा प्रयत्न :देशात सध्या विविध पातळ्यांवर उलथापाल सुरू आहे मणिपूर सारखा ज्वलंत विषय दाबण्यासाठी मनोर भिडे सारखे लोक सातत्याने अशा प्रकारचे विधान करत असतात भूतकाळातल्या एखाद्या गोष्टीला संदर्भ नसताना असे विधान करून महत्त्वाचे मुद्दे जनतेच्या नजरेतून हद्दपार करण्याचा हा डाव आहे. असे 'गांधी का मरत नाही' या पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हटले आहे.

Last Updated : Jul 28, 2023, 3:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details