महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांनो मशागतीला लागा; 'हे' वर्ष शेतीसाठी सुगीचे - Maharashtra Weather Update

राज्यातील काही भागात अचानक अवकाळी पावसामुळे काही भाग झोडपून निघाले. या बदलत्या वातावरणाचा मात्र, शेती पिकांना फटका बसला परंतू यावर्षी शेतीला सुगीचा काळ राहणार आहे. तसेच पुन्हा विदर्भात 24 आणि 25 मे रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Unseasonal Rain
शेतीसाठी सुगीचे दिवस

By

Published : May 11, 2023, 8:34 PM IST

वातावरणाची माहिती देताना प्राध्यापक अनिल बंड

अमरावती:गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन आणि पाऊस असे सत्र सुरू आहे. यावर्षी उन्हाळ्यात विदर्भात सर्वत्र अवकाळी पाऊस कोसळला. आता पुन्हा 24 आणि 25 मे रोजी पावसाची शक्यता आहे. एकूणच यावर्षी शेतीला सुगीचा काळ राहणार आहे. आता जमिनीमध्ये ओलावा असल्याने आता शेतकऱ्यांनी मशागतीला लागणे फायदेशीर राहणार असल्याचे कृषी आणि हवामान तज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी सांगितले.



विदर्भाच्या तापमानात होणार वाढ:सध्या चक्रीवादळ दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात पोर्टल पासून नैऋत्यकडे पाचशे किलोमीटर अंतरावर आहे. या चक्रीवादळाचा प्रवास उत्तर वायव्य दिशेने होऊन गुरुवारी मध्यरात्री याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होईल. त्यानंतर12 मे रोजी याची दिशा बदलून उत्तर पूर्व होईल आणि हे मध्यवर्ती बंगालच्या उपसागरात पोहोचेल तेव्हा याचा वेग 100 ते 140 किलोमीटर प्रति तास राहू शकतो. हे वादळ 14 मे ला कमजोर पडून बांगलादेश किनारपट्टीला क्रॉस करण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणजे विदर्भातच्या तापमानात वाढ होईल.

गोवामध्ये हलक्या पावसाची शक्यता: येत्या दोन दिवसात विदर्भात कमाल तापमानात दोन ते चार डिग्री सेल्सियस वाढ होऊ शकते. आता विदर्भात आकाश निरभ्र राहील, तसेच विदर्भात कमाल तापमान 41 ते 44 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहू शकते. तर किमान तापमान 22 ते 26 डिग्री दरम्यान राहील. 18 मे पर्यंत विदर्भात वातावरण कोरडे आणि उष्ण राहील. कोकण गोवामध्ये हलक्या पावसाची शक्यता असल्याचे प्राध्यापक अनिल बंड यांनी सांगितले.



कांदा साठवताना घ्यावी काळजी: अवकाळी पावसामुळे संत्री, कांदा आणि आंब्याला मोठा फटका बसला. आता पाऊस गेल्यामुळे गहू कांदा संत्रा अशा सर्वच पिकांच्या काढणीला वेग आला आहे. गहू पूर्णतः शेतातून निघून गेला आहे. कांद्याची काढणी मात्र सुरू आहे. आता वातावरण निरभ्र असल्यामुळे कांद्यासाठी वातावरण चांगले आहे. मागे झालेल्या पावसामुळे कांद्यावर रोग आल्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करताना कांद्याचा रोग वाढणार नाही आणि कांद्याच्या गंजीमध्ये जे काही खराब कांदे असतील त्यांना काढून फेकावे. असा सल्ला बंडे यांनी दिला आहे.



24 आणि 25 ला पुन्हा पाऊस: चार-पाच दिवसानंतर म्हणजे 24, 25 तारखेला पुन्हा विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी लवकरात लवकर तयार करून तनमुक्त करावे. यावर्षी एलनिनो हा घटक तटस्थ राहण्याची शक्यता असल्यामुळे, तसेच आयओडी हा घटक सुद्धा पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता असल्यामुळे, पावसाळ्यावर याचा विषय परिणाम होण्याची शक्यता नाही. यावर्षी पावसाळा वेळेवर आणि चांगल्या प्रकारे राहण्याची शक्यता असल्याचे अनिल बंड यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Unseasonal Rain In Buldhana बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर अनेक घरांची छपरे उडाली झाड जळून खाक
  2. Crop Loss Due To Unseasonal Rain अवकाळी पावसाने पळवले शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी साठवलेला कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ
  3. Maharashtra Weather Update राज्यात पुढील चार ते पाच दिवस यलो अलर्ट हवामान विभागाचा अंदाज

ABOUT THE AUTHOR

...view details