अमरावती -बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. परिणामी शेंगा पोखरणाऱ्या अळीचा तुरीवरप्रादुर्भाव काही ठिकाणी दिसला आहे. वातावरणातील आर्द्रतेचा अभाव असल्याने या अळीचा प्रादुर्भाव दिसत असल्याचे अनेकांचे मत आहे. वेळीच नियोजन न झाल्यास तुरीच्या पिकाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, या संकटाने शेतकरी पुन्हा एकदा हतबल झाला आहे.
आधीच पावसामुळे झाले नुकसान -
या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या मुसळधार पावसामुळे कपाशी, सोयाबीन याबरोबरच तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर तूर उत्पादक शेतकरी कसेबसे यातून सावरत नाही, तर आता पुन्हा ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचे सावट आले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.
हेही वाचा - नेहमी हसतमुख, उत्तम क्षेत्ररक्षक आणि स्फोटक फलंदाज...रैनाचे ३४व्या वर्षांत पदार्पण