अमरावती - दुसऱ्या मुलांसोबत गम्मत केली या क्षुल्लक कारणावरून वसतिगृहातील वार्डने एका १२ वर्षीय आदीवासी विद्यार्थ्यास पट्टा व काठीने बेदम मारहाण केली. ही घटना अमरावती येथील धारणी येथील ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहात घडली आहे. राजेंद्र बेठेकर (वय १२) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
क्षुल्लक कारणावरून वसतिगृहातील विद्यार्थ्यास बेदम मारहाण - अमरावती
अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याने १४ मार्चला दुसऱ्या मुलासोबत गम्मत केली होती. या क्षुल्लक कारणावरूनच वसतिगृहातील वॉर्ड आनंद सावरकर यांनी राजेंद्र याला काठी व बेल्टने जबर मारहाण केली.
अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याने १४ मार्चला दुसऱ्या मुलासोबत गम्मत केली होती. या क्षुल्लक कारणावरूनच वसतिगृहातील वॉर्ड आनंद सावरकर यांनी राजेंद्र याला काठी व बेल्टने जबर मारहाण केली. राजेंद्र हा धारणीतील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहावीत शिकत आहे. तो धारणीतील बॅप्टिस्ट क्रिश्चन असोसिएशनच्या वसतिगृहात राहत आहे. या प्रकरणात १५ मार्चला शाळेच्या शिक्षकास लक्षात आले.
राजेंद्रचा मामा रामदास कास्देकर यांच्या तक्रारीवरून धारणी पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी आरोपी आनंद सावरकरला अटक करण्यात आली आहे. मात्र,अशा प्रकारे विद्यार्थ्यास मारहाण करणाऱ्या वॉर्डविषयी संताप व्यक्त होत असून,कठोर कारवाईची मागणी होत आहे.