अमरावती - मेळघाटातील पिंपळखुटा गावचे २७ वर्षीय सुपुत्र कैलास दहिकर यांना पाच दिवसांपूर्वी कुलू मनाली येथे वीरमरण आले. मागील आठ वर्षांपासून ते सैन्यात सेवा देत होते. आज त्यांचा पार्थीवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशासाठी सेवा देत असतांना वीरमरण प्राप्त झालेल्या आपल्या लाडक्या सुपुत्राचे अंत्यदर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती.
कडाक्याच्या थंडीमूळे पेटवलेल्या शेगडीचा झाला स्फोट -
२७ वर्षीय सैनिक कैलास कालुदास दहिकर हे वयाच्या १७ व्या वर्षी सैन्यात दाखल झाले होते. सध्या ते बिहारच्या पंधरा रेजिमेंटमध्ये आपली सेवा देत होते. अशातच पाच दिवसांपूर्वी कुलू मनाली मध्ये कर्तव्यावर असतात. कडाक्याच्या थंडीमूळे पेटवलेल्या शेगडीचा भडका उडून त्यांचा स्फोट झाला होता. यामध्ये सैनिक कैलास कालुदास दहिकर यांना वीरमरण आले.