अमरावती:अमरावतीतील 55 वर्षांच्या मेडिकल चालकाची हत्या करण्यात आली. उमेश कोल्हे असे या मेडिकल चालकाचे नाव आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने ही हत्या केल्याचा आरोप भाजपने केला. त्यानंतर याप्रकरणाबाबात पोलीस उपायुक्तांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) नुपूर शर्मांबाबात समाज माध्ममावर केलेल्या पोस्टमुळेच करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी स्पष्ट केले आहे. हत्या प्रकरण 21 जूनच्या रात्रीचे आहे. हत्या झाली तेव्हा त्यांच्या जवळील मुद्देमाल तसाच होता त्यामुळे या हत्ये पाठीमागे लुटपाट करण्याचा हेतु नव्हता हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे हत्येच्या कारणांवरचा सस्पेन्स कायम होता. अखेर ही हत्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ केलेल्या पोष्ट मुळे झाल्याचे पोलीसांनी जाहिर केले.
मनमिळावू स्वभाव:शहरातील घनश्यामनगर भागात उमेश प्रल्हाद कोल्हे हे रहायचे. त्यांना तीन भाऊ मुलगा पुतने सुन असा मोठा परिवार एकत्र रहायचा. उमेश यांचे शहरातील तहसील कार्यालय परिसरात मेडीकलचे दुकान आहे. या दुकानात प्राण्यांना लागणारी औषधी तसेच खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तु मिळायच्या. उमेश यांचा स्वभाव एकदम मनमिळावु होता. सगळे जण त्यांना सरळ आणि चांगला मानुस म्हणुन पहायचे त्यांचे कोणाशी वैर नव्हते.मनमिळावू स्वभावामुळे त्यांच्या सहवासातील लोक त्यांना मानायचे त्यामुळेच त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या परीचितांना चांगलाच धक्का बसला. त्यांच्या अशा जाण्या बद्दल परीवारासह सर्व संबंधित हळहळ व्यक्त करत आहेत
आधिच दबा धरुन बसले होते मारेकरी:मंगळवार 21 जून रोजी रोजच्या प्रमाणे उमेश यांनी रात्री 10 नंतर दुकानातील सगळा हिशोब केला आणि गल्यातील पैसे सोबत घेऊन दुकान बंद केले. त्यांचा मुलगा संकेत आणि त्याची पत्नी म्हणजे उमेश यांची सून वैष्णवी हे पण त्यांच्या सोबत होते. सगळे एकत्रच निघाले उमेश यांची स्कुटी समोर होती तर संकेत आणि वैष्णवी त्यांच्या पाठोपाठ निघाले. घराकडे हे सगळे निघाले असताना न्यू हायस्कूल समोरच्या गल्लीत त्यांनी गाडी टाकली. त्यावेळी थोडे पुढे गेल्या नंतर त्यांना एका गाडीजवळ तीघेजण उभे असल्याचे दिसले. त्यातील एकाच्या हातात चाकू होता.
मुलांसमोरच चिरला गळा:उमेश यांची गाडी जवळ येताच त्या तीघांनी त्यांना अडवे आले त्यामुळे उमेश यांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्याचवेळी कोणाला काही कळायच्या आत ज्याच्या हातात चाकू होता त्याने अगदी सऱ्हाईतपणे त्यांच्या गळ्यावर चाकु चालवला. क्षणार्धात उमेश यांना मोठा रक्तश्राव सुरु झाला आणि ते त्याच अवस्थेत रस्त्यावर कोसळले. पाठीमागुन येत असलेल्या संकेत आणि वैष्णवी यांच्या समोरच उमेश यांचा गळा चिरला गेला आणि ते पडले वार इतका मोठा होता की उमेश यांना जागेवरुन हालताही आले नाही. कोणाला काही कळायच्या आत हा प्रकार घडला होता.