महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सूर्यवंशींकडून 8 लाख वसूल करा; उच्च शिक्षण सहसंचालकांचे प्राचार्यांना पत्र

1 जानेवारी 2014 ते 31 मार्च 2018 या काळात प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी महाविद्यालयातून विविध सुट्या घेतल्या होत्या. सुटी घेतली असतानाही या कालावधीत त्यांनी 8 लाख 51 हजार, 483 रुपये घेतले होते. प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी सुरीवर असताना रक्कम हडपल्याबाबत उच्च शिक्षण संचालकांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या.

prof surwanshi fraud payment issue
प्रा. सूर्यवंशीं

By

Published : Oct 1, 2020, 8:40 AM IST


अमरावती- भाजपचे अमरावती जिल्हा माजी अध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी सलग चार वर्षे विविध रजा कालावधीत शासनाकडून बेकायदेशीरपणे 8 लाख 51 हजार, 483 रुपये लाटलेले आहेत. ती रक्कम तत्काळ वसूल करावी, असे पत्र उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.केशव तुपे यांनी किरण नगर स्थित नरसम्मा एज्युकेशन सोसायटी संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिले आहे. प्राध्यापक असणाऱ्या भाजपच्या माजी अध्यक्षांच्या या प्रतापमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्रा. सूर्यवंशींकडून 8 लाख वसूल करा
2014 मध्ये देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आपल्यावर प्रा. दिनेश सूर्यवंशी यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. 17 जानेवारी 2016 ला त्यांचच्यावर पक्षाने अमरावती जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविली होती. दरम्यान 1 जानेवारी 2014 ते 31 मार्च 2018 या काळात प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी महाविद्यालयातून विविध सुट्या घेतल्या होत्या. सुटी घेतली असतानाही या कालावधीत त्यांनी 8 लाख 51 हजार, 483 रुपये घेतले होते. प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी सुरीवर असताना रक्कम हडपल्याबाबत उच्च शिक्षण संचालकांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीनुसार जानेवारी 2019 मध्ये या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशानुसार प्रा. दिनेश सूर्यवंशी यांचायवर निलंबनाची कारवाई तसेच विभागीय चौकशीसह आवश्यक कायदेशीर कारवाई आणि महाविद्यालयाकडून घेतलेल्या वेतनाची वसुलीची कारवाई करावी, असे स्पष्ट केले होते.

जानेवारी महिन्यात दिलेल्या आदेशानुसार कारवाई झाली की नाही, याबाबत उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तांबे यांनी 21 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा प्राचार्यां डॉ. राजेश चंदनपट यांना पत्र दिले आहे. महाविद्यालयाचे आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून आपली ही सर्वस्वी जबाबदारी असुल्याची नोंद घेऊन प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्याकडून 8 लाख 51 हजार 483 रुपये तत्काळ वसूल करून शासनाच्या खात्यात जमा करावे आणि त्याच्या चलनाची साक्षांकित प्रत तात्काळ सादर करावी, असे स्पष्ट केले आहे. भाजपचे पदाधिकारी असणाऱ्या प्राध्यापकाने असा प्रताप केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात विविध चर्चना सध्या उधाण आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details