'जिजाऊ ब्रिगेड'च्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त आयोजित पालखी सोहळा उत्साहात पार - amravati news
संत गाडगेबाबा समाधी मंदिर येथून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊंची मूर्ती आणि ग्रंथ आहेत. पालखीसमोर ढोल-ताशा आणि महिलांचे लेझीम पथक आहे.
अमरावती
अमरावती - जिजाऊ ब्रिगेडचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन 11 आणि 12 ऑगस्टला अमरावतीत होत आहे. यानिमित्ताने आज जिजाऊ पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या.