अमरावती -जगभरातआज पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये देखील योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
अमरावतीच्या चांदूर रेल्वे आयटीआयमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
चांदूर रेल्वेच्या आयटीआयमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी मारोती मर्दाने, प्रशांत टांगले, शरद बेहरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना अनुलोम-विलोम, दीर्घश्वसन, प्राणायाम, सूर्यनमस्काराची क्रिया, दृष्टीआसन आदी योगाचे प्रकार शिकविले. यावेळी प्राचार्य पाटबागे, गटनिदेशक शिंगणे यांच्यासह सर्व निदेशक उपस्थित होते.
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचे मोठे महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठे महत्व प्राप्त झाले आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात २१ जून २०१५ पासून झाली. यंदा योग दिन साजरे करण्याचे पाचवे वर्ष आहे.