अमरावती -जिल्ह्यात महापुरुषाच्यापुतळ्याची विटंबना केल्याचा धक्कादायक ( Insult of great mens statue ) प्रकार घडला आहे. या घटनेमुळे गावात सध्या तणावाचे वातावरण ( tense situation in Amravatis village ) आहे.
महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे समजतात गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ( Police force deployed in village ) करण्यात आला आहे. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी पोलीस ( Amravati Police ) घेत आहेत.
अमरावती जिल्ह्यात महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना; गावात तणावाचे वातावरण
महापुरुषाची विटंबना झाल्याच्या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी टायर जाळून घटनेचा निषेध केला. सध्या संपूर्ण गाव बंद करण्यात आले आहे. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यत शांत बसणार नाही, असा इशारा देत ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
हेही वाचा-राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना सोलापुरात कडाडून विरोध; काळे झेंडे दखवले
ग्रामस्थांनी केला निषेध
महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी टायर जाळून घटनेचा निषेध केला. सध्या संपूर्ण गाव बंद करण्यात आले आहे. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यत शांत बसणार नाही, असा इशारा देत ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यापूर्वीही असाच प्रकार घडला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलीस या प्रकाराबाबत गंभीर नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.