महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Navneet Rana : पंतप्रधानांचा आदर्श घ्यावा, खासदार नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला - संजय राऊतांची पंतप्रधानावर टीका

गुजरातचा विकास ( Development of Gujarat ) खुप चांगल्या पद्धतीने झाला आहे. पंतप्रधान ( Prime Minister ) गृहमंत्री यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांचा आर्दश घ्या, असा सल्ला खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) दिला आहे. तसेच संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी टीकास्त्र ( MP Navneet Rana criticizes Sanjay Raut ) सोडले आहे.

MP Navneet Rana
खासदार नवनीत राणा

By

Published : Dec 5, 2022, 10:25 PM IST

अमरावती -गुजरातचा विकास ( Development of Gujarat ) केला मग गुजरातमध्ये प्रचार करण्याची गरज कशाला भासते, असे वक्तव्य करीत खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पंतप्रधान ( Prime Minister ) देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका ( Sanjay Raut criticizes the Prime Minister ) केली. यावर अमरावतीच्या भाजप खासदार नवणीत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधानांचा आदर्श घ्या - वास्तवात लोकांचा विकास करून देखील आम्ही लोकांमध्ये वावरतो आहोत, त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहोत. आम्ही खरं तर जमिनीवर आहोत याचे भान पंतप्रधान, गृहमंत्र्यांना आहे . खरंतर या दोन्ही मोठ्या नेत्यांचा आदर्श देशातील सर्वच नेत्यांनी घ्यायला हवा अशी टीका अमरावतीच्या खासदार नवणीत राणा यांनी दिली आहे.

संजय राऊतानी ठाकरेंना सल्ला देण्याची गरज - खरंतर या आदर्शाची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नितांत गरज आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर टीका न करता उद्धव ठाकरे यांना योग्य सल्ला द्यावा असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर खासदार नवनीत राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

नवनीत राणा

मंत्रीपदाची गरज नाही -महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना आमदार रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल किंवा नाही मिळेल याबाबत मला कुठलाही इंटरेस्ट नाही. खरंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यावर जनतेची कामे झपाट्याने व्हायला लागली आहे. आमच्या कामाचे प्रस्ताव त्वरित मार्गी लागत असून सर्वसामान्य जनतेचे भले होत आहे.

स्कायवॉक होणार, विमानही उडणार - अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे जगातील सर्वात मोठाच स्कायवॉक होतो आहे. हाच काय वाघ संरक्षित व्याघ्र प्रकल्पातून जात असल्यामुळे हे काम रखडले असून आता केवळ केंद्रातील एकाच परवानगीची गरज शिल्लक राहिली आहे. ज्यांची परवानगी आवश्यक आहे, त्याचे प्रमुख पंतप्रधान असून या समितीची बैठक जानेवारी महिन्यात होईल. पंतप्रधान चिखलदऱ्याचा वाघ प्रश्न निकाली काढून विकास कामाला परवानगी देतील अशी अशा व्यक्त राणा यांनी केली.

अमरावतीत विमान घेणार झेप - अमरावती विमानतळाच्या धावपट्टीसाठी नव्याने निविदा काढल्या जाणार असून येत्या पंधरा दिवसात ह्या निविदा निघाल्यावर जानेवारी महिन्यात विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू होईल. अमरावती विमानतळावरून आता वर्षभरात विमान झेपावेल असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details