महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ranjit Patil News : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी डॉ. रणजीत पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा - युवा स्वाभिमान संघटनेकडून मोळाव्याचे आयोजन

डॉ. रणजीत पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश भवन येथे आयोजित मेळाव्यात डॉक्टर रणजीत पाटील यांच्या विजयासाठी आवाहन करणारी भाषणे देण्यात आली होती.

Indictable case against Ranjit Patil
रणजीत पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा

By

Published : Jan 30, 2023, 1:32 PM IST

रणजीत पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा

अमरावती : अमरावती पदवीधर मतदार संघासाठी आज 30 जानेवारीला निवडणूक होत आहे. भाजपचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थनार्थ रविवारी शहरातील महेश भवन येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा प्रकार आचारसंहितेचा भंग असल्यामुळे डॉक्टर रणजीत पाटील यांच्यासह तिघांविरोधात अदाखल पात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



युवा स्वाभिमानचे आयोजन : युवा स्वाभिमान संघटनेचे प्रमुख आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी शहरातील महेश भवन येथे अमरावती पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांच्या प्रचारासाठी रविवारी सभा आयोजित केली होती. या सभेला स्वतः डॉक्टर रणजीत पाटील यांच्यासह भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता तिकडे, शहर अध्यक्ष किरण पातुरकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह युवा स्वाभिमान संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात डॉक्टर रणजीत पाटील यांना या निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी आवाहन करणारी भाषणे देण्यात आली होती.


फिरत्या पथकाची कारवाई : अमरावती विभाग पदवीधर मतदार संघासाठी आज 30 जानेवारीला मतदान होत असताना 28 जानेवारीला सायंकाळी चार वाजता आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे प्रचार तोफा थंडावल्या. असे असताना युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने महेश भवन येथे डॉक्टर रणजीत पाटील यांच्या समर्थनार्थ मेळावा आयोजित करण्यात आला. त्याची माहिती प्रशासनाच्या फिरत्या पथकाला मिळाली. फिरत्या पथकाचे प्रमुख डीजे गावणे यांच्यासह त्यांचे सहकारी महेश भवन येथे पोहोचले असताना त्यावेळी मंचावर भाजपचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. या संपूर्ण प्रकार संदर्भातील त्या पथकाने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारावर राजापेठ पोलिसांनी डॉक्टर रणजीत पाटील यांच्यासह महेश भवन येथील दोन पदाधिकाऱ्यांविरोधात कलम 123 भारतीय लोक प्रतिनिधित्व अधिनियमाद्वारे अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

61 मतदान केंद्रांची उभारणी : अमरावती पदवीधरची ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. कारण भाजप विरुद्ध सर्वच पक्ष या निवडणुकीत उभे आहे. या निवडणुकीत विभागातील 30 विधानसभा मतदार संघाचा समावेश असून 56 तालुके आहेत. अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि यवतमाळ अशा पाच जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील एकूण 2,06,175 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर अकोल्यात एकूण 50,606 मतदार मतदानाचा हक्क बाजवणार आहे. यासाठी 61 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

हेही वाचा :Amravati Graduate Constituency election: अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक; मतदानाला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details