महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदगावपेठेत पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमीपूजन; पशुधनाची निगा राखण्यासाठी अद्ययावत सेवा - यशोमती ठाकूर अमरावती बातमी

पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेणे शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असते. परिसरातील पशुधनाच्या तुलनेने पशुवैद्यकीय दवाखान्याची उपलब्धता असणे गरजेचे आहे. ही गरज ओळखुन हा पशुवैद्यकीय दवाखाना तत्काळ उभारला जाईल.

yashomati thakur
yashomati thakur

By

Published : Mar 16, 2021, 10:51 PM IST

अमरावती- पशुधनाची निगा,पशुआजारावर वेळीच उपचार व साथींवर नियंत्रणासाठी ग्रामीण परिसरात अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखाना असणे आवश्यक आहे. नांदगावपेठेसारखे अनेक गावे जोडलेल्या महत्वाच्या गावी उभारला जाणारा पशुवैद्यकीय दवाखाना अत्याधुनिक,अद्ययावत आणि सर्व यंत्रणांनी सुसज्ज असेल.अशी ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.नांदगावपेठ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, पशुधनाचे कृषी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे.शेतकरी आपल्या पशुधनावर पोटच्या मुलासारखे प्रेम करत असतो. पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेणे शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असते. परिसरातील पशुधनाच्या तुलनेने पशुवैद्यकीय दवाखान्याची उपलब्धता असणे गरजेचे आहे. ही गरज ओळखुन हा पशुवैद्यकीय दवाखाना तत्काळ उभारला जाईल. दवाखान्याच्या सुसज्ज इमारतीचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासोबतच सर्व काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावे. असे निर्देशही यावेळी यशोमती ठाकूर यांनी संबंधितांना दिले आहे.

हेही वाचा-डीएफआयच्या स्थापनेकरता २० हजार कोटींचे अर्थसहाय्य करण्याकरता केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

ABOUT THE AUTHOR

...view details