महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुसऱ्यासाठी जेवण बनवणारेच आज स्वतःच्या पोटासाठी संकटात

कोरोनामुळे सगळे व्यवसाय लॉक झाले आहेत. अमरावतीत केटरर्स व्यवसाय तर पूर्णपण ठप्प पडले आहेत. अनेक केटरर्सवर आर्थिक संकट आले आहे. त्यातच कोरोनामुळे कोणत्याही कार्यक्रमात लोकांची मर्यादा आहे. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाची ऑर्डर मिळाली, तर एकाच व्यक्तीला सर्वांचा स्वयंपाक बनवावा लागत आहे. त्यामुळे शासनाने केटर्सला मदत करावी, अशी मागणी नेताजी केटरर्सचे संचालक गजानन जाधव यांनी केली आहे.

amravati
अमरावती

By

Published : Jun 13, 2021, 8:23 PM IST

अमरावती -लग्न, वाढदिवस, बारसे तेरवी, स्नेहसंमेलन, विविध विषयांच्या परिषदा; आनंदाच्या वा दुःखाच्या प्रसंगात एकत्र येणाऱ्या लोकांसाठी खास जेवणाची व्यवस्था करणाऱ्या केटरर्स व्यवसायिकांनाचा आता त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या संकटात सारे काही लॉक झाले आहे. त्यात केटरर्स व्यवसायही ठप्प झाले आहेत. अनेकांना आता आपला हा व्यवसाय रुळावर येणार की नाही? याची भीतीही वाटायला लागली आहे. त्यामुळे अनेक केटरर्स व्यवसायिकांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत.

नेताजी केटरर्सचे संचालक गजानन जाधव

अमरावती शहरातील 200 हुन अधिक केटरर्स व्यवसाय ठप्प

अमरावती शहरात जवळपास 225 केटरर्स व्यवसायिक आहेत. देशावर कोरोनाचे संकट ओढवताच 20 मार्च 2020 रोजी लॉकडाऊन जाहिर झाला. या लॉकडाऊनचा फटका जवळपास सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायिकांना बसला आहे. अमरावती शहरातील केटरर्स व्यवसाय तर पूर्ण कोलमडून गेला आहे.

आता एकालाच करावा लागतो सर्वांचा स्वयंपाक

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन आणि प्रशासनाने लग्न असो वा अन्य कोणतेही कार्यक्रम; यासाठी मोजक्या लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमात घरच्याच मंडळींना स्वयंपाकाची जबाबदरी घ्यावी लागत आहे. काही जणांनी केटरर्सला ऑर्डर दिली. मात्र ज्या कार्यक्रमात स्वयंपाकीसह 8-10 जण लागायचे. तिथे आज एकाच व्यक्तीला सर्व स्वयंपाक करावा लागत आहे. विशेष म्हणजे आता आपापले मोजकेच लोक बोलावून कार्यक्रम पार पाडावे लागत आहेत. केटरर्स व्यवसायिकांसाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे बोलले जात आहे.

'शासनाने मदत करावी'

शहारातील नेताजी केटरर्सचे संचालक गजानन जाधव यांनी आपली व्यथा 'ईटीव्ही भारत'समोर मांडली. यावेळी त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. 'स्वतः सह आपल्यासोबत काम करणाऱ्या 10 महिला, 8 तरुण अशा 18-19 कुटुंबाचे पालनपोषण करणारा केटरर्स व्यवसाय 16 महिन्यांपासून बंद आहे. सुरुवातीला लॉकडाऊन असा लांब चालेल माहिती नव्हते. लॉकडाऊन लागताच काही साहित्यांची दुरुस्ती केली. आपल्या कामगारांनाही आर्थिक मदत केली. मात्र, काही दिवसातच सारे काही पालटले. वडिल आणि लहान भावाला कोरोना झाला. यातच दोघेही गेले. घर आणि व्यवसायासाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते कधी थकले तर बँक काही म्हणत नव्हती. आता लॉकडाऊन काळात थेट घर जप्तीची नोटीस पाठवली. मुलांचे शिक्षण सुरू आहे. त्यांच्या गरज पूर्ण करण्यास आज असमर्थ ठरतो आहे, याचे दुःख वाटते. लग्न, वाढदिवस अशा कार्यक्रमांसह विद्यापिठात जेवण पुरवण्याचे काम आमच्याकडे होते. मात्र, सगळीकडची कामे बंद आहेत. शासनाने राज्यभरातील केटरर्स व्यवसायिकांवर असलेले कर्ज वसुलीसाठी बँकांनी काही दिवस तगादा लावू नयेत यासाठी काही आदेश काढावेत. आम्हाला बँकांचा पैसा बुडवायचा नाही. मात्र, सद्याच्या परिस्थितीत आमच्या अडचणी समजून घ्याव्यात', अशा अपेक्षा गाजनन जाधव व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा -'उठता-बसता मुंबई आमची आहे असं बोलणाऱ्यांनी मुंबईला काय दिलं?'

ABOUT THE AUTHOR

...view details