महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#COVID19 : महिला कर्मचाऱ्याच्या हातावर होम क्वारन्टाईचा शिक्का, बँकेत खळबळ - COVID19

हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असतानाही स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या मोर्शी शाखेत एक महिला कामावर आली होती. एका ग्राहकाच्या निदर्शनास आली. त्यानंतर एकच खबळब उडाली.

स्टेट बँक मोर्शी शाखा
स्टेट बँक मोर्शी शाखा

By

Published : Mar 24, 2020, 8:22 AM IST

अमरावती- मोर्शी तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या शाखेत एका महिला कर्मचाऱ्यांच्या हातावर होम क्वारन्टाईचा शिक्का होता तरीही ती महिला कार्तव्य बजावत होती. पण, हा शिक्का बँकेत आलेल्या एका व्यक्तीस दिसला आणि खळबळ उडाली. अनेकांनी तर बँकेतून बाहेर पळ काढला या सर्व गोंधळामुळे मोर्शी एसबीआयच्या शाखेत चांगलीच खळबळ उडाली.

महिला कर्मचाऱ्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का, बँकेत खळबळ

या महिला कर्मचाऱ्याने डॉक्‍टरांच्या सांगण्यानुसार घरी राहणे आवश्यक असताना त्या बँकेत कामावर रुजू झाल्या. दरम्यान, पैशांचा व्यवहार करताना बँक कर्मचारी महिलेच्या हातावर होम क्वारन्टाईचा शिक्का दिसताच बँकेत एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे संपूर्ण मोर्शी शहर हादरले. दरम्यान, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने बँकेत कार्यरत त्या महिलेसह बँकेतील कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी आणले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले.

हेही वाचा -अंजनगाव सुर्जीतील एकविरा देवी मंदिर बंद, सार्वजनिक स्नेहभोजनावरही बंदी

ABOUT THE AUTHOR

...view details