अमरावती - शहरात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज दिवसभर ढगाळ वातावरण असताना सायंकाळी मुसळधार पाऊस बरसला.
अमरावतीत मुसळधार पाऊस - मान्सूनपूर्व पाऊस
अमरावतीत सायंकाळी साडेसहा वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पाऊस कोसळल्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.
अमरावतीत मुसळधार पाऊस
अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले असताना महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती शहरात बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेसहा वाजता मुसळधार पाऊस बरसायला लागला. गेल्या आठ दिवसांपासून सूर्य आग ओकत असताना आज मात्र ढगाळ वातावरणामुळे अमरावतीकरांना उन्हाचे चटके जाणवले नाहीत. सायंकाळी पाऊस कोसळल्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.