अमरावती - शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळला. जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सारी बरसल्या तर अनेक ठिकाणी आकाशात काळे ढग दाटून आले. तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने अमरावती शहरातील अनेक भागात पाणी साचले.
अमरावती शहरात मुसळधार पाऊस
अमरावती शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळला. तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने अमरावती शहरातील अनेक भागात पाणी साचले. शहरातून वाहणारा आंबनाला यावर्षी साफ करण्यात आला नसल्याने अवघ्या तासभराच्या मुसळधार पावसाने अनेक भागात नाल्याला पूर आल्याची परिस्थिती झाली.
शुक्रवारी दिवसभर आकाश निरभ्र असताना सायंकाळी 5.30 नंतर असकाशात काळे ढग दाटून येताच मुसळधार पावसाचे चिन्ह दिसून आली. कोरोनामुळे शुक्रवारी सायंकाळी 7 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत संचारबंदी असल्याने ऐन शहर बंद होण्याच्या वेळेवर मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात होताच घराबाहेर असणाऱ्या अमरावतीकरांची तारांबळ उडाली. जोरदार पाऊस बरसायला लागतच नमुना परिसर, अंबादेवी मंदिर परिसर, गडगेनागर, शेगाव नाका, गडगडेश्वर, महादेवखोरी, आदी आकोली आदी भागत पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
शहरातून वाहणारा आंबनाला यावर्षी साफ करण्यात आला नसल्याने अवघ्या तासभराच्या मुसळधार पावसाने अनेक भागात नाल्याला पूर आल्याची परिस्थिती झाली. तासाभराच्या पावसाने शहरातील वडाळी आणि छत्री तलावांची पातळी बरीच वाढली. अमरावतीसह, तिवसा, चांदुर रेल्वे, भातकुली या तालुक्यातही चांगला पाऊस बरसला. मेळघाटात ढग दाटून आले असून मेळघाटात रात्री जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.