अमरावती- तिवसा तालुक्यात आज दुपारी ४ वाजता पहिला मुसळधार पाऊस बरसला. या मुसळधार पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. ढगाळ वातावरणामुळे भरदिवसा रात्र झाल्याची स्थिती तास भर होती. या पावसाने अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
अमरावतीच्या तिवसा तालुक्यात मुसळधार पाऊस
तिवसा तालुक्यात यंदा प्रथमच मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. तिवसा येथे राष्ट्रीय महामार्गावर पावसाच्या दमदार हजेरीने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती
तिवसा तालुक्यात यंदा प्रथमच मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली.
तालुक्यात यंदा प्रथमच मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. तिवसा येथे राष्ट्रीय महामार्गावर पावसाच्या दमदार हजेरीने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दहा दिवसानंतर दीड तास पावसाच्या दमदार हजेरीने दिलासा मिळाला आहे. सकाळ पासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले होते. परिसरातील सुर्यगंगा नदीला दोन वर्षानंतर पूर आल्याने गावकऱ्यांनी नदी परिसरात एकच गर्दी केली होती.