अमरावतीभाजपाचे आमदार प्रवीण पोटे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनजागृतीसाठी प्रचार रथ तयार केला होता रथाच्या तिन्ही बाजुला तिरंगा अभियानाचे बॅनर लावले होते बॅनरवर नरेंद्र मोदी व आमदार प्रवीण पोटे यांचे फोटो होते शुक्रवारी सकाळी प्रचार रथ मसानगंज परिसरात जात असतांना हॉटेल आदर्श समोर उभा होता त्या वेळी वसीम ने रथावरील फोटो पाहिले आणि या सरकारने आमचे धान्य कमी केले असे म्हणत गाडीच्या चावीने बॅनर फाडल्याची कबुली पोलिसांना दिली आहे
असा लागला आरोपीचा शोधघटनेचे गांभीर्य लक्षात घेता रथ चालकाने भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगताच त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली होती पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध घेण्याच्या दृष्टीने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली तेव्हा तेथे एक युवक रथा वरील बॅनर फाडत असल्याचे दिसून आले पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली आहे राग अनावर झाल्याने बॅनर फाडल्या ची कबुली त्याने पोलिसांना दिली