महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती जिल्हा बँकेवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलचा झेंडा - पालकमंत्री यशोमती ठाकूर

मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असताना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पॅनलच्या काही कार्यकर्त्यांनी गाडगे नगर येथील मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना चोप देऊन अटक केली या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

सहकार पॅनलचा झेंडा
सहकार पॅनलचा झेंडा

By

Published : Oct 5, 2021, 7:04 PM IST

अमरावती- पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वर्चस्वाची लढाई म्हणून गत अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलचा झेंडा पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर फडकला असून निवडणुकीत उमेदवार असणारे बच्चू कडू निवडून आले. मात्र त्यांचे पॅनल पराभूत झाले आहे.

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलचा झेंडा

सहकार पॅनलचे 12 संचालक विजयी

सहकार पॅनलचा झेंडा

एकूण 21 संचालक असणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चार जण निर्विरोध आले असताना एकूण 17 संचालक पदांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत एकूण 48 उमेदवार मैदानात होते एकूण 94 टक्के मतदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले. सोमवारी संत गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरातील सभागृहात मतमोजणी झाली. या निवडणुकीत सहकार पॅनलचे जिल्हा मतदार संघातून बबलू देशमुख विजयी झाले. त्यांनी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके यांचा 94 मतांनी पराभव केला. बबलू देशमुख यांच्यासह अमरावती तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, चांदुर रेल्वे तालुक्यातून काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप, भातकुली तालुक्यातून हरिभाऊ मोहोड, चिखलदर्‍यातून दयाराम काळे, धामणगाव रेल्वे येथून श्रीकांत गावंडे, दर्यापूर येथून सुधाकर भारसाकळे, पतसंस्था मतदारसंघातून प्रकाश काळबांडे, एसटी मतदारसंघातून दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, विमुक्त जाती मतदारसंघातून बाळासाहेब अलोणे महिला मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे आणि मोनिका मार्डीकर या निवडून आल्या.

परिवर्तन पॅनलच्या चौघांचा विजय

परिवर्तन पॅनलचे नेतृत्व राज्यमंत्री बच्चू कडू तसेच अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय घोडके यांनी केले होते. या निवडणुकीत संजय खोडके पराभूत झाले. तर चांदुर बाजार येथून बच्चू कडू, अंजनगाव सुर्जी तालुक्यातून अजय मेहकरे, मोर्शी येथून चित्र डहाणे आणि वैयक्तिक भागधारक मतदारसंघातून रवींद्र गायगोले हे चार जण परिवर्तन पॅनल मधून निवडून आले आहे.

चारजण निर्विरोध

या निवडणुकीत अचलपूरचे आनंद काळे हे अपक्ष म्हणून विजय झाले तर वरुड तालुक्यातून नरेशचंद्र ठाकरे, नांदगाव खंडेश्वर येथून अभिजीत ढेपे, तिवसा येथून साबळे आणि धारणी येथून जयप्रकाश पटेल हे निर्विरोध बँकेच्या संचालक पदावर आले आहेत.

मतमोजणी केंद्राबाहेर तणाव

सहकार पॅनलचा झेंडा

मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असताना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पॅनलच्या काही कार्यकर्त्यांनी गाडगे नगर येथील मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना चोप देऊन अटक केली या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details