महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 26, 2019, 11:49 PM IST

ETV Bharat / state

यावलीमध्ये ग्रामगीता सप्ताहाला सुरुवात; ३० तारखेला तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव

३० तारखेला सकाळी ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान महत्त्वपूर्ण असा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

अमरावती- विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा अर्थात ग्रामजयंती महोत्सवानिमित्त ग्रामगीता सप्ताहाला सुरुवात झाली आहे. येत्या ३० तारखेला प्रातःकाळी ४ ते ६ वाजेपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा भव्य दिव्य डोळे दिपवणारा जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्रातून हजारो गुरुदेव भक्त अमरावतीच्या यावली गावात दाखल होणार आहेत.

यावलीमधील ग्रामगीता महोत्सव

तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जिल्ह्यातील यावली शहीद या गावात ग्रामजयंती महोत्सवाला २३ तारखेला सकाळी ५ वाजता सुरुवात झाली. ७ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दैनंदिन कार्यक्रमात सकाळी साडेपाच वाजता सामुदायिक ध्यान व चिंतन, सहा ते साडेसात रामधून आणि भाषण, आठ ते अकरा सुसंस्कार शिबीर, दुपारी ३ ते ६ संगीत ग्रामगीता, प्रवचन, सायंकाळी ७ ते साडेसात सामुदायिक प्रार्थना, असे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत.

विशेष कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय कीर्तन, सुरसंगम गीत, पंचरंगी प्रभोधन कार्यक्रमासह आदी कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रविवारी स्मशानभूमीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ३० तारखेला सकाळी ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान महत्त्वपूर्ण असा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. दुपारी १ ते ३ दरम्यान गोपाळ काला आणि महाप्रसाद, तर रात्री ९ ते ११ दरम्यान सप्तखंजेरी वादक इंजिनिअर पवन दवनडे यांच्या प्रभोधन कार्यक्रमाने सांगता होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details