अमरावती -सध्या कोरोनाची लागण झपाट्याने वाढत असल्याने सरकार लसीकरणावर जास्त भर देत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची तिसरी लाट आली तर ती लहान मुलांकरिता धोकादायक असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारने लहान मुलांच्या लसीकरणाबाबत विचार करावा, अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
१ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना लस द्या; खासदार नवनीत राणांची मागणी
पुढील कोरोनाच्या लाटेत लहान मुलांवर परिणाम होणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने 1 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची गरज असून सर्व मुलांचे तात्काळ लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांना बाधा झाली. त्यानंतर मध्यम वयातील लोकांना कोरोनाची लागण झाली. मात्र पुढील कोरोनाच्या लाटेत लहान मुलांवर परिणाम होणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने 1 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची गरज असून सर्व मुलांचे तत्काळ लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे केली आहे.