महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत पाळण्याच्या दोरीचा फास लागून विद्यार्थिनीचा मृत्यू

मोर्शी शहरातील गुरुदेव नगरमधील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला पाळण्याच्या दोरीचा फास लागून मृत्यू झाला आहे.

पीडित मुलगी

By

Published : Mar 28, 2019, 9:13 PM IST

अमरावती - मोर्शी शहरातील गुरुदेव नगरमधील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीलापाळण्याच्या दोरीचा फास लागून दुर्दैवीमृत्यू झाला. निकीता संजय ताथोडकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास निकीता घरातील पाळण्यावर झोके घेत होती. यावेळी अनावधानाने तिच्या गळ्याला पाळण्याचा दोर गुंडाळला गेला आणि तिला फास बसला. हे लक्षात आल्यानंतर घरातील व्यक्तींनी तिला मोर्शी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी तिला मृत केले घोषीत केले.

घटनेची माहिती समजताच शिवाजी शाळेच्या शिक्षकांनी तिच्या घरी भेट दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोर्शी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details