अमरावती - मेळघाटातील घाटांग रेंजच्या बिहाळी गावालगत जंगलात रविवारी रात्रीपासून भीषण आग लागली होती. मात्र, वनविभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश मिळाले आहे. या आगीमुळे नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे.
मेळघाटातील घाटांग जंगलात भीषण वणवा - मेळघाट
जंगलात झाडांवरचे मोहफुल गोळा करणे शक्य व्हावे यासाठी बिहाळीच्या घनदाट जंगलात आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घाटांगच्या जंगलात लागलेली आग
आगीमुळे आसमंतात धुराचे लोट पसरले होते. सरपटणारे जीव आणि पक्षी सैरभैर झाले होते. सोमवारी दुपारपर्यंत या आगची धग कायम होती. वनविभागाने ही आग विझवत नाहीतर सायंकाळी पुन्हा वणवा भडकला. त्यामुळे वन कर्मचारी पुन्हा एकदा आग आटोक्यात आणण्यासाठी सक्रीय झाले होते.
जंगलात झाडांवरचे मोहफुल गोळा करणे शक्य व्हावे यासाठी बिहाळीच्या घनदाट जंगलात आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.