अमरावती- अमरावतीवरून परतवाड्याला मुलीच्या लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी खासगी बस समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने अपघात झाला. यात ४ जण जखमी झाले आहेत. वलगाव लगतच्या पेढी नदीच्या पुलावर हा अपघात झाला.
अमरावतीत लग्नाचे वऱहाड घेऊन जाणाऱया खासगी बसला अपघात, ४ जखमी - marriage
अमरावती येथील लखानी कुटुंबातील मुलीचे आज परतवाडा येथे लग्न होते.
अमरावती येथील लखानी कुटुंबातील मुलीचे आज परतवाडा येथे लग्न होते. लग्नासाठी लखानी कुटुंबीयांनी दोन खासगी बस भाड्याने घेतल्या होत्या. पहिली बस वलगाव लगतच्या पेढी नदीवरील पुलावरून समोर गेल्यावर माघून येणारी दुसरी बस समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळाली. सुदैवाने दोन्ही वाहन पुलावरून खाली कोसळली नाहीत.
या अपघातात बसमधील चार जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे अमरावतीकडून वलगाव आणि वलगावकडून अमरावतीला येणारी वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच्यालांब रांग लागली होती. सुमारे दोन तासाने क्रेनच्या साहाय्याने पुलावरील अपघातग्रस्त बस आणि ट्रक बाजूला हटवण्यात आले. यावेळी वलगाव पोलीस व वाहतूक पोलिसही घटनास्थळी हजर होते.