अमरावती -मासेमारी करणाऱ्या आदिवासी युवकाला वान व्याघ्र प्रकल्प कर्मचाऱ्याकडून गरम लोखंडी forest employee hot iron rod hit fishing tribal youth सळईने चटके देण्यात आले. या प्रकारामुळे मेळघाटात tribal youth Melghat Amravati खळबळ उडाली आहे. संबंधित वन कर्मचाऱ्यांविरोधात धारणी पोलीस Dharni Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश गोरेलाल मावस्कर असे तरुणाचे नाव आहे. गंभीररीत्या भाजलेल्या तरुणावर उपचार सुरू आहेत.
मासेमारीसाठी प्रतिबंधित असणाऱ्या धरणावर गेले होते तिघेजण : अंकुश गोरेलाल मावस्कर (२५) या धुळघाट रेल्वे येथील रहिवासी असणाऱ्या जखमी युवकाचे नाव आहे. अंकुश हा गावातीलच आनंद कास्देकर आणि पप्पू चव्हाण या दोन सहकाऱ्यांसोबत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागाअंतर्गत वान वनपरिक्षेत्रातील वान धरणावर गेले होते. मासेमारी करण्यासाठी त्यांनी जाळे टाकले. या धरणावर मासेमारी प्रतिबंधित आहे. अवैध मासेमारी केल्याप्रकरणी वनकर्मचाऱ्यांनी या तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर सुमारे सात ते आठ कर्मचाऱ्यांनी आपल्याला मारहाण करून गरम सळईचे चटके दिल्याचा आरोप अंकुश मावस्कर याने केला आहे.