अमरावती - उन्हाळ्यात आगीपासून जंगल सुरक्षित रहावे, यासाठी अमरावतीतील मेळघाट जंगलात मचाण कॅम्प उभारण्यात आले आहे. या मचाणावर २४ तास वनपाल, वनरक्षक आणि वन विभागाचे कर्मचारी तैनात आहेत. जंगलाचे नुकसान होऊ नये, वन्यप्राणीही सुरक्षित राहावे, यासाठी वन्यजीव विभागाद्वारे विशेष काळजी घेतली जात आहे.
जंगल सरंक्षणासाठी २४ तास कर्मचारी तैनात; मचाणावरून ठेवतात लक्ष - fire
पावसाळा लागेपर्यंत या मचाण कॅम्पवर २४ तास वनकर्मचारी तैनात आहेत. या मचाण कॅम्पवर वायरलेस यंत्रणेची सुविधा असून आग विझविण्यासाठी ब्लॉरमशिनही सज्ज आहेत. सोलर युनिटद्वारे मचाणावर विजेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
मेळघाटातील घनदाट जंगलात उन्हाळ्यात काही समाजकंटकांकडून जंगलाला आग लावण्याचे प्रकार घडतात. विस्तीर्ण अशा जंगल भागात आग विझविण्यासाठी वन कर्मचाऱ्यांची धावपळ होते. उन्हाळ्यात जंगल सुरक्षित राहावे, यासाठी फेब्रुवारी महिन्यापासूनच प्रत्येक वन वर्तुळात मोक्याच्या ठिकाणी मचाण कॅम्प उभारण्यात आले आहे. पावसाळा लागेपर्यंत या मचाण कॅम्पवर २४ तास वनकर्मचारी तैनात आहेत. या मचाण कॅम्पवर वायरलेस यंत्रणेची सुविधा असून आग विझविण्यासाठी ब्लॉरमशिनही सज्ज आहेत. सोलर युनिटद्वारे मचाणावर विजेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
मेळघाटातील जंगलसह जंगलातील वाघ, बिबटे, अस्वल, नीलगाय आदी प्राणी आणि पक्षी सुरक्षित राहावेत याची जबाबदारीही मचाण कॅम्पवर तैनात वन कर्मचारी चोखपणे बाजवतात. मेळघाटातील अतिशय दुर्गम आशा गोलाई वन वर्तुळ येथील मचाण कॅम्पवर तैनात वनपाल डी.एस. वांगे यांनी जंगलात आग लागली तर ती विझविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आमचे वनरक्षक आणि मजुर या कॅम्प मचाणावर २४ तास सज्ज असतात, अशी माहिती ' ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. वनपरिक्षेत्रांतर्गत गोलाईसह राणीगाव, सुसरदा, मोगरदा याठिकाणी कॅम्प मचाण आहेत, अशी माहितीही डी.एस. वांगे यांनी दिली.