अमरावती- विविध नागरी मागण्यांसाठी अमरावतीच्या चांदुर रेल्वे नगरपरिषदमध्ये पाच नगरसेवकानी ठिय्या आंदोलन केले आहे. या आंदोलनात महिला नगरसेवकांचाही समावेश आहे.
नागरी मागण्यांसाठी चांदुर रेल्वे नगरपरिषदमध्ये नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन - नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
35 हजार लोकसंख्या असलेल्या चांदुर शहराला फक्त दोन टँकरने पाणीपुरवठा होत आहे. कमीत कमी चार टँकर लावावे यासोबत चार कोटींचे रखडलेले कामे पुर्ण करावीत, अशा अनेक मागण्यांसाठी पाच नगरसेवकानी ठिय्या मांडला
नागरी मागण्यांसाठी चांदुर रेल्वे नगरपरिषदमध्ये नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
नगरपरिषदेने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले असून एक महिन्यापासून कुठलीही साफसफाई होत नाही. पाणीपुरवठासाठी 21 बोअरवेलचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून असून नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला आहे आहे.
35 हजार लोकसंख्या असलेल्या चांदुर शहराला फक्त दोन टँकरने पाणीपुरवठा होत आहे. कमीत कमी चार टँकर लावावे यासोबत चार कोटींचे रखडलेले कामे पुर्ण करावीत, अशा अनेक मागण्यांसाठी पाच नगरसेवकानी ठिय्या मांडला आहे.