अमरावती :पहिल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्घाटन दुपारी तीन वाजता आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांच्या उपस्थितीत डॉक्टर सुभाष सावरकर यांच्या हस्ते होणार आहे. आज आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांची प्रकट मुलाखत तसेच प्राध्यापक जयश्री सोनारे यांचा स्वरधारेचा राष्ट्रसंत भजन संगीत मैत्रीचा कार्यक्रम तसेच रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रसंतांची जन्मभूमी :अमरावती जिल्हा ही राष्ट्रसंतांची जन्मभूमी आहे. त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूनेच त्यांच्याच जन्मभूमीत पहिले राष्ट्रीय तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अमरावतीत भरवण्यात येणार आहे. येथील अभियंता भवन येथे ४ आणि ५ फेब्रुवारी असे दोन दिवस या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 पुण्यस्मरण निमित्त पहिले राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे आयोजन अमरावतीत करण्यात आले आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अजून प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्यस्तरीय संमेलन संपन्न होणार आहे. येथील अभियंता भवन येथे 4 व 5 फेब्रुवारी दरम्यान सेवा फाऊंडेशन व राष्ट्रधर्म युवा मंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजालारावती जिल्हा यांच्यावतीने या राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विचारांचा प्रचार व प्रसार हा मुख्य हेतू :अमरावती जिल्ह्यातील यावली हे राष्ट्रसंतांची जन्मभूमी आहे. त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होऊन सर्व घटकांपर्यंत पोहोचावा या मुख्य हेतूने या राज्यस्तरीय संमेलनांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजन समिती दिली आहे. हे राज्यस्तरीय संमेलन शिस्तबद्ध व सुरळीत पार पाडावे यासाठी मार्गदर्शन समिती, आयोजन समिती , व्यवस्थापन समिती, भोजन समिती, स्वच्छता व शिस्त समिती, सामुदायिक ध्यान प्रार्थना समिती, पाणी व वाहन समिती अशा विविध समित्यांचे गठन लवकरच होणार असून वेरुळकर गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीच्या बैठकीदरम्यान ही माहिती देण्यात आली आहे.