अमरावती - शहरात गुरुवारी एका व्यक्तीचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला आहे. मृत रुग्ण हा 45 वर्ष वयाचा होता. मात्र, मृताला कोरोनाची लागण होती की नाही? हे अजून समजलेले नाही. यासाठी त्याचा स्वब तपासणीसाठी नागपूरला पाठवीण्यात आला आहे.
अमरावतीत एकाचा न्यूमोनियामुळे मृत्यू; स्वॅब चाचणी अहवालाची प्रतीक्षा - न्यूमोनिया रुग्ण
सध्या अमरावती शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. शहरात गुरुवारी एका व्यक्तिचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला आहे. अद्याप अहवाल प्राप्त न झाल्यामुळे रुग्ण कोरोनामुळे दगावला की नाही हे स्पष्ट झालेला नाही.
सध्या अमरावती शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. दिल्ली येथे आयोजित मरकझमधून अमरावती जिल्ह्यात आलेल्यांची अधिकृत सांख्य 23 आहे. या सर्व जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यापैकी कोणत्याही व्यक्तीत कोरोनाचे लक्षण अद्याप आढळून आले नाही.
दरम्यान, गुरुवारी सकाळी 11 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या मृत व्यक्तीबाबत आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सदर व्यक्ती निमोनियामुळे दगावली असल्याचे स्पष्ट केले. हा व्यक्ती काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर बडनेरा येथील महापालिकेच्या मोदी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारीच या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालतात हलविण्यात आले होते. निमोनियचा रुग्ण असणाऱ्या या व्यक्तीचा स्वॅब कोरोना चाचणीसाठी आधीच घेण्यात आला होता. या स्वॅबचा चाचणी अहवाल शनिवारी येणार असल्याचेही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले.