अमरावती - जिल्ह्यात वाढलेल्या उन्हामुळे रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी डांबर वितळवणाऱ्या बॉयलरला आग लागल्याची घटना घडली. वेळीच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. मात्र या घटनेमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.
उन्हाच्या झळामुळे डांबर वितळवणाऱ्या बॉयलर मिक्सरला आग - आग
वाढलेल्या उन्हामुळे रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी डांबर वितळवणाऱ्या बॉयलरला आग लागल्याची घटना घडली. वेळीच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.
काटोल- कोंढाळी रोडवर रिंगरोड लगत काटोलपासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर वरुड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे महामार्ग नुतनीकरणाचे काम सुरू आहे. आज दुपारच्या सुमारास वाढलेल्या उन्हामुळे डांबर वितळविणा-या बॉयलर मिक्सरला अचानक आग लागली. या आगीने लगेचच रौद्र रूप धारण केले.
तेव्हा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. या आगीने मात्र, या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.