अमरावती -जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर गावात आज सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. जनावरांच्या गोठ्याला ही आग लागली. नागरिकांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
दरम्यान आग लागल्याची घटना कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग लागलेल्या गोठ्यातील जनावरे नागरिकांनी सोडून दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत गोठा तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आग फटाक्यांमुळे लागल्याचा अंदाज आहे. आग लागल्याचे समजताच तिवसा पोलीस आणि अग्निशमनदल देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.