महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात रेस्टॉरंट अँड बारला आग; ड्रायडे असल्यामुळे जीवित हानी नाही - एमआयडीसी

गणपती विसर्जनामुळे आज (रविवार) ड्राय डे असल्याने हे रेस्टॉरंट अँड बार बंद होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीट होऊन रेस्टॉरंटला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली असली तरी या आगीमुळे हॉटेलच्या काउंटरसह हॉटेलमधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. गणपती विसर्जनानिमित्त आज ड्रायडे असल्यामुळे प्रत्येक रविवारी दिवसभर गजबजून असणाऱ्या या हॉटेलला कुलुप होते. कोणी नसताना ही घटना घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

c
c

By

Published : Sep 19, 2021, 10:41 PM IST

अमरावती -शहरा जवळील एमआयडीसी परिसरात जुन्या महामार्गावर असणाऱ्या एका रेस्टॉरंट अँड बारला रविवारी (दि. 19 सप्टेंबर) दुपारी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली आग लागली. त्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात संपूर्ण रेस्टॉरंट जळून खाक झाले आहे. यामुळे एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली.

एमआयडीसी परिसरात रेस्टॉरंट अँड बारला आग

ड्रायडे असल्याने रेस्टॉरंट होते बंद

गणपती विसर्जनामुळे आज (रविवार) ड्राय डे असल्याने हे रेस्टॉरंट अँड बार बंद होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्कीट होऊन रेस्टॉरंटला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली असली तरी या आगीमुळे हॉटेलच्या काउंटरसह हॉटेलमधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. गणपती विसर्जनानिमित्त आज ड्रायडे असल्यामुळे प्रत्येक रविवारी दिवसभर गजबजून असणाऱ्या या हॉटेलला कुलुप होते. कोणी नसताना ही घटना घडल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

दारुमुळे भडकली आग

रेस्टॉरंट अँड बारला दुपारी दीड वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यावर बारमध्ये असणाऱ्या दारुमुळे या आगीने रौद्ररुप धारण केले होते. रेस्टॉरंटच्या खालच्या भागात असणाऱ्या गोदामात मोठ्या प्रमाणात दारू साठा होता. मात्र, गोदामापर्यंत सुदैवाने आग पोहोचली नसल्यामुळे गोदामातील दारू साठा या भीषण आगीत दही बचावला.

महिनाभरातील चौथी घटना

अमरावती शहरात महिनाभरात आग लागल्याची ही चौथी घटना आहे. 27 ऑगस्टला एमआयडीसी परिसरात नॅशनल पेट्रीसाईज अँड केमिकल या कारखान्याला भीषण आग लागली होती. 29 ऑगस्टला बडनेरालगत पाळा येथे शिव बयोकेम या कारखान्याला आग लागली होती. तसेच 31 ऑगस्ट रोजी राजापेठ पोलीस ठाण्यासमोर हॉटेल इम्पेरीयाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. या आगीत नागपूर येथील एक व्यक्ती दगावलाी होती.

हेही वाचा -अमरावती विद्यापीठात केवळ विद्यार्थी नव्हे, तर क्रिएटर घडवणार; कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडेंचे संकल्प

ABOUT THE AUTHOR

...view details