अमरावती - सोयाबीनच्या बोगस बियाणांचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फटका बसला. सोयाबीन पेरले पण उगवलेच नाही, अशा हजारो तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातही बोगस बियाण्यांसंदर्भात शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु कृषी केंद्र संचालक व बियाणे कंपनी विरोधात कुठलीही ठोस कारवाई झाली नसल्याने आता अमरावती जिल्ह्यातील शिराळा गावातील शेतकऱ्यांनी थेट दोन कृषी सेवा केंद्र संचालक व बियाणे कंपनी विरोधात वलगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली.
सोयाबीन बोगस बियाणे प्रकरण: अमरावतीमध्ये दोन दुकानदारांवर प्रथमच फौजदारी गुन्हा दाखल - soyabean fraud seed amravati
पोलिसांनी दोन कृषी केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल केले असून, चौकशीनंतर तीन बियाणे कंपनी विरोधातही गुन्हे दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, बोगस बियाण्याच्या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल झाल्याची अमरावती जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
पोलिसांनी दोन कृषी केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल केले असून, चौकशीनंतर तीन बियाणे कंपनी विरोधातही गुन्हे दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, बोगस बियाण्यांच्या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल झाल्याची अमरावती जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
अमरावती जिल्ह्यातील शिराळा या गावातील अनिल गंधे, भगवंतराव गंधे, निलेश तऱ्हेकर, राजेंद्र लव्हाळे, कृष्णराव देव असे तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. या पाचही शेतकऱ्यांनी त्यांच्याच शिराळा गावातील शौर्य कृषी सेवा केंद्र व भारत कृषी सेवा केंद्र या दुकानातून बियाणे खरेदी केले होते. बियाण्यामध्ये महाबीज, सिद्ध सिड्स, आणि उत्सव या तीन बियाणे कंपनी विरोधात शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे.