महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारुड्या मुलाने केला वडिलांचा खून, अमरावतीतील धक्कादायक घटना

धान्य विकण्याच्या क्षुल्लक कारणावरून मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भिलोना या गावात ही घटना घडली आहे. त्यात आश्चर्यजनक बाब म्हणजे, हा आरोपी मुलगा रात्रभर आपल्या वडिलांच्या मृतदेहाजवळ झोपला होता.

अमरावती
father murdered by son in amravati

By

Published : Oct 16, 2020, 12:15 PM IST

अमरावती -धान्य विकण्याच्या क्षुल्लक कारणावरून मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भिलोना या गावात ही घटना घडली आहे. त्यात आश्चर्यजनक बाब म्हणजे, हा आरोपीं मुलगा रात्रभर आपल्या वडिलांच्या मृतदेहाजवळ झोपला होता. सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी २५ वर्षीय आरोपी बाळकृष्ण मालवे याला अटक केली आहे.
रमेश मालवे हे पत्नी व एक मुलासह भिलोना या गावात राहात होते. बुधवारी रमेश यांनी सरकारी स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणले होते. अशातच आरोपी मुलगा बाळकृष्णने हे धान्य विकून दारू पिऊन घरी आला. त्यावेळी वडील आणि आरोपी मुलाचा वाद झाला. याच वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी काठी मारून त्यांचा खून केला. नंतर तो रात्रभर वडिलांच्या मृतदेहाजवळ झोपून राहिला. सकाळी मोठ्या भावाला वडील घराबाहेर न दिसल्याने त्यांनी आत डोकावून पाहिले, असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर आरोपी मुलाला अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details