अमरावती -गेल्या तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पेरणीला सुरुवात झाला असून शेतकऱ्यांनी पारंपरीक पेरणीला फाटा देत बी.बी.एफ. या आधुनिक यंत्राद्वारे पेरणीला सुरुवात केली आहे. यामुळे उत्पादनामध्ये २० ते २५ टक्के वाढ होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
अमरावतीमध्ये शेतकऱ्यांनी केली बीबीएफ यंत्राने पेरणी
दरवर्षी, पारंपरीक पद्धतीने पेरणी केली जाते. मात्र, यंदा जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने अमरावतीलगत असलेल्या कामुंजा या गावामध्ये बीबीएफ पेरणी पद्धतीचे प्रात्याक्षिक केले. या यंत्राने पेरणी करताना दोन्ही बाजूला चर पडतात. त्यामुळे त्याठिकाणी असलेले अनावश्यक पाणी निघून दोन्ही बाजूंच्या लहान नाल्यामध्ये निघून जाते.
दरवर्षी, पारंपरीक पद्धतीने पेरणी केली जाते. मात्र, यंदा जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने अमरावतीलगत असलेल्या कामुंजा या गावामध्ये बीबीएफ पेरणी पद्धतीचे प्रात्याक्षिक केले. या यंत्राने पेरणी करताना दोन्ही बाजूला चर पडतात. त्यामुळे त्याठिकाणी असलेले अनावश्यक पाणी निघून दोन्ही बाजूंच्या लहान नाल्यामध्ये निघून जाते. ज्यावेळी पिकांना पाण्याची गरज असते. त्यावेळी या नाल्यामधील पाणी पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे उत्पादनामध्ये जवळपास २० ते २५ टक्के वाढ होत असल्याचे तालुका कृषि अधिकारी हतागळे यांनी सांगितले. यावेळी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.