अमरावती -काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज भव्य मोर्चा काढत कृषीमंत्र्यांचा निषेध केला. त्यानंतर भाजपचे वरुड-मोर्शी तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत यांनी मोर्चेकरांवर टीका केली. विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते नौटंकी करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
'कृषीमंत्र्यांच्या घरावरील मोर्चा म्हणजे विरोधकांची नौटंकी' - ncp
कृषीमंत्र्यांच्या घरावर काढलेला मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा होता, असा आरोप भाजपचे वरुड-मोर्शी तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत यांनी केला.
कृषीमंत्र्यांच्या घरावर काढलेला मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा होता. ज्या नेत्यांनी मोर्चा काढला त्यांची दुकानदारी बंद पडलेली आहे. आगामी निवडणुकीत ती दुकाने चालू करुन लोकांना आपल्या पाठीशी घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, वरुड मोर्शी तालुक्यातील जनता ही बोंडे यांच्या पाठीमागे उभी आहे, असेही राऊत म्हणाले.
यावेळी बोंडे यांच्या पत्नी वसुधा यांनी दुष्काळग्रस्त भागात शासनातर्फे दिल्या जाणारा निधी वरुड-मोर्शी तालुक्यात पोचला असल्याची माहिती दिली. तर उर्वरित मागण्यांबाबत कृषीमंत्र्यांचे प्रयत्न सुरू असून यावर लवकरात लवकर तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला.